'एबीआयएल'तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रूपयांची मदत ; तर पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनासाठी ५० लाखांचा निधी


पुणे - येथील अविनाश भोसले समूहाने ( एबीआयएल ) कोरोना विरुद्धच्या लढयासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये १ कोटी इतकी मदत केली आहे. त्याबरोबर पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापना करीता ५० लाखांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.


कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर उपचार पद्धती पुण्यातील ससून रुग्णालयात उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले वैद्यकीय उपकरण म्हणजे प्लाझ्मा सेपरेटर मशीन हे होय. हे मशिन घेण्यासाठी एबीआयएलच्या वतीने २८ लाख इतकी आर्थिक मदत करण्यात आली आहे.


एबीआयएलच्या वतीने दररोज सुमारे ७०० हून अधिक गरिबांची जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येत आहे. तर आजपर्यंत १० हजारहून अधिक नागरिकांना किराणामाल सामान व सॅनिटायजरचे मोफत वाटप देखील करण्यात आले आहे.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image