'मॉर्निंग वॉक' वाले, विनाकारण भटकणारे व मास्क न वापरणाऱ्या ७० जणांवर कारवाई


तळेगाव दाभाडे –  सकाळी मॉर्निंग वाॅकसाठी जाणारे, तोंडावरती मास्क नसणारे, तसेच विनाकारण फिरणारे नागरिक यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडीलकर यांनी सुमारे ७० नागरिकांवर कारवाई केली. 


कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून तळेगाव परिसरात अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जात आहे. यास अनुसरून अनेक वेळा नागरिकांना सूचना देखील केल्या जात आहे. परंतु या सूचनांची  कदर न करता काही नागरिक बेफिकीरपणे शहरांमध्ये तसेच परिसरात आपला वावर करत आहे. त्यांना या संसर्ग विषाणूचे गांभीर्य लक्षात येत नाही असे दिसते. त्यास अनुसरून अशी कारवाई केल्याची माहिती गाडीलकर यांनी दिली.


या कारवाईमध्ये पोलीस हवालदार विष्णू लांडगे, उमेश पुजारी, काशिनाथ मोरे, आनंद मोहिते, वैभव नलगे, महादेव  तापकीर आदि पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.


सकाळी सहा वाजता तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पेपर आणण्यासाठी जाणारे, मॉर्निंग वॉकसाठी जाणारे व अन्य कारणाने बाहेर पडलेल्या नागरिकांना चौकामध्ये बसवून घेऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचे व्यायाम करून घेतले तसेच त्यांना गाडीलकर यांनी कडक समज दिली. 


तळेगावमध्ये अशा प्रकारची सामुदायिक कारवाई प्रथमच केली आहे. यापुढे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई  करण्यात येईल येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image