कल्याण : सरकारी व सामाजिक संस्था तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांकडून गोरगरिबांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
शहरातील आदिवासी पाड्यांवर राहणा-या लोकांना कोणतीच सुविधा मिळत नव्हती. तसेच, घरापासून दुकाने ही बरीच दुरवर असल्याने त्यात lockdown मुळे त्यांना जाण्यासाठी त्रास होत होता. हि बाब पोलिसांच्या लक्षात आली. तेव्हा, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३, कल्याण श्री विवेक पानसरे यांच्या पुढाकाराने अशा पाड्यांचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर, कल्याण पश्चिमेतील जैन कॉलनी परिसरात असलेल्या अमीवर्षा सोसायटीतील रहिवाशांनी दहा दिवस पुरेल इतके धान्य, तेल तसेच इतर शिधा जमा केला.
शहरातील वाडेघर, उंबर्डे, मोहने, आधारवाडी या ठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ३, कल्याण अँटी रॉबरी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या पुढाकाराने व त्यांच्या पथकाने १३० कुटूंबाना (५०० लोकांना) सदरचे धान्य वाटप केले.