ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची नौपाडा पोलीस स्टेशनला भेट


ठाणे - करोनाविरुध्दच्या लढाईसाठी सध्या पोलीस दलातील कर्मचारी चोवीस तास रस्त्यावर ऊतरुन आपले कर्तव्य बजावत आहेत. 


पोलीसांच्या या खाकी वर्दीमागील माणसाची काळजी घेण्यासाठी मा.एकऩाथ शिंदे यांनी स्वतः नौपाडा पोलीस स्टेशन येथे भेंट देऊन सर्व कर्मचारी वर्गाला सुरक्षेसाठी मास्क, सँनिटायझर तसेच शिध्याचे वाटप केले. तसेच राज्य सरकार व शिवसेना पोलीस दलाच्या खंबीरपणे पाठीशी ऊभी असल्याची ग्वाही दिली. 


ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शक्य त्या सर्व पोलीस स्टेशनना जातीने भेंट देऊन पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.


सदर प्रसंगी स्थायीसमिती सभापती राम रेपाले ,नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे आपल्या कार्यकर्त्यासह ऊपस्थित होते.


सोशल डिस्टनिंगचं उत्तम उदाहरण