केवळ लाईट बंद करा,घरातील इतर उपकरणे सुरु ठेवा - ऊर्जा मंत्रालय


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.५) एप्रिल रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून, मेणबत्ती व मोबाईल टाॅर्च लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अचानक सर्वत्र लाईट बंद केल्यानंतर इलेक्ट्रिक ग्रिडवर परिणाम होईल अशी माहिती समोर येत आहे. 


त्यामुळे यादिवशी केवळ लाईट बंद करावा व घरातली इतर उपकरणं टीव्ही, पंखा, फ्रिज बंद न करण्याचे आवाहन केंद्रीय उर्जा मंत्रालयाने केले आहे. तसेच सर्व पथदिवे चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


कोरोनच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे ५ एप्रिल रोजी रात्री ९ ते ९.०९ या वेळेत घरातले दिवे बंद ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. 


घरामध्ये संगणक, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि एसी किंवा इतर उपकरणे बंद करण्याची कोणताही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे केवळ घरातील दिवे बंद करा.


रुग्णालयातील दिवे व इतर सर्व आवश्यक सेवा जसे की सार्वजनिक सुविधा, महानगरपालिका सेवा, कार्यालये, पोलिस ठाणे, उत्पादन सुविधा इत्यादी कायम राहतील.तसेच सर्व स्थानिक संस्थांना सार्वजनिक सुरक्षेसाठी पथदिवे सुरू ठेवण्याचा सूचना देखील करण्यात आल्याचे केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.