कोरोना सारख्या संकटात कोणीही राजकारण करू नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई – सध्या महाराष्ट्र राज्यासह देशावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या संकटात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे. 


मंगळवारी रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेशी संवाद साधून सद्यःपरिस्थितीची माहिती दिली.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, करोना’सारख्या संकटात सामना करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत आहेत.त्यामुळे कोणीही आगडोंब टाकत असेल तर त्याला हे सरकार माफ करणार नाही. तसेच आजपर्यंत जनतेनं जशी साथ दिली तशीच साथ यापुढेही द्यावी. तरच आपण कोरोनाच युद्ध आपण आरामात जिंकू शकू. कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची यंत्रणा सज्ज आहे.


ठिकठिकाणी धान्य आणि तांदूळ याचे वाटप केले जात आहे. तसेच डाळीचेही वाटप करण्यात येणार आहे. सध्या शिवभोजन थाळीची संख्या सुमारे ८० हजार पर्यंत करण्यात येणार आहे. आणि गरज वाढल्यास याची व्याप्ती देखील वाढविण्यात येणार आहे.


याचबरोबर याअगोदर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे २१ हजार कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा आमच्याशी अर्ज करून कोरोनाच्या लढ्यात सामील होणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात बीसीजीच्या लसची चाचणी होणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील मजुरांनाहि विश्वास दिला असून कोणीही बाहेर पडू नये, आहे तेथे थांबावे, आम्ही आपल्यासाठी योग्य त्या सोयी सुविधा करत आहोत. आम्ही तुमची काळजी घेत आहोत. त्यामुळे कोणीही संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही, असं वागू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.