संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त,तेराशे नागरिकांना बजावल्या नोटिसा, तर चारशे जणांवर गुन्हे दाखल
पुणे : देशासह राज्यात सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.
याबाबत पुणे पोलिसांनी आतापर्यंत संचारबंदी आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
विनाकारण घराबाहेर पडल्याप्रकरणी १२८७ नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत.तर जे नागरिक बाहेर पडले आहेत. त्यांची १५१६ वाहने जप्त केली आहेत.
पुण्यातील स्वारगेट चौकात जे विनाकारण नागरिक बाहेर फिरत आहेत.त्या नागरिकांच्या वाहने ठेवून घेऊन त्यांना घरी पाठवले जात आहे.नाही तर बसवून एक दोन तास बसून ठेवलं जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी काळजी घ्यायला हवी.तसेच या दरम्यान गुन्हे दाखल झाले तर भविष्यात याचा परिणाम गुन्हा दाखल होणाऱ्या नागरिकांना भोगावा लागणार आहे.त्यामुळे तुम्ही विनाकारण लॉकडाउन काळात बाहेर फिरला तर पोलीस कारवाई करणार आहेत.