कोरोना प्रसंगी गरीबांसाठी धावुन आली खाकी वर्दीतील देवमाणसं


अनेकांना केले जिवनावश्यक वस्तुंचे  वाटप


मुरबाड  :  जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने  माणसाला माणसात आणण्याचे काम केल्याने माणसातील खरी माणुसकी जाग्रुत झाली आहे.त्यामुळे एरव्ही पैसा,धन,संपतीचा गर्व दाखवणारी मंडळी आज जगात फक्त माणुसकी धर्म खरा असुन ,बाकी सगळं काही विसरून माणुसकीच्या नात्याने एक दुस-यासाठी मदतीचा हात देवु लागली आहेत. सगळं जग कोरोनामुळे.थांबलं असताना गोरगरीब मजुर रोंजदारीवर हातावर पोट असणारी मंडळी यांची होणारी उपासमार होवू नये म्हणून खरा देव या माणसातच आहे हे ओळखुन आपली दोन घासाची भुक ठेवून ते गोरगरीबांच्या मुखी कसा लागेल यासाठी पुढे येत आहेत.


खरं तर एरव्ही जनतेला कायदा सुव्यवस्थेचा बडगा दाखवत धाक दाखवणार्या पोलीस यंत्रणेला सुद्धा या कोरोनाने माणुसकीची जाणीव करून दिली आहे.एकीकडे आपले कर्तव्य बजावत जनतेला सुरक्षेचे कानमंत्र देत असताना, जनतेचे होणारे हाल पाहून मात्र या धाक दाखवणा-या पोलीसांची ही मने हेलावुन टाकली आहेत.या खाकी वर्दीतील देवमाणसं या प्रसंगाने आज समोर येवून मदतीचा हात पुढे करू लागली आहेत.


असाच एक प्रकार मुरबाड तालुक्यात घडला असुन, काल दिनांक २१/०४/२०२० रोजी आपली  सामाजिक बंधीलकी जपत मुरबाड  विभागीय पोलीस  अधिक्षक डॉ. श्री. बसवराज शिवपूजे साहेब (डी. वाय. एस. पी) मुरबाड  पोलीस स्टेशनचे वरिष्ठ  निरीक्षक मा.श्री.दत्तात्रय बोराटे साहेब यांनी वर्दी पलीकडील माणुसकीचे दर्शन दाखवून दिले .त्यांनी यावेळी तालुक्यातील  संतवाडी, लव्हाळी  येथील सुमारे ११० आदिवासी समाजातील गरीब व गरजू कुटुंबाला  जिवनावश्यक असे तूरडाळ, हळद, मिठ, मसाला,चहा पावडर, साखर, तेल अशाप्रकारे साहित्याचे वाटप पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन  केले. यावेळी दोन्ही वरिष्ठ आधिकारी स्वतः पुढाकार घेऊन *मानव सेवा हिच ईश्वर सेवा*  याप्रमाणे कार्य करत आहेत. *सलाम* मुरबाड पोलीस ठाण्याला . वस्तूंचे वितरण करतेवेळी मुरबाड उप विभागीय पोलीस अधिकारी  मा. श्री. डॉ.बसवराज शिवपूजे साहेब, मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय बोराटे साहेब व मुरबाड पोलीस ठाण्यातील  पोलीस कर्मचारी, मासले बेलपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सदाभाऊ सोमणे, ग्रामपंचायत कर्मचारी, श्री. रमेश  कथोरे , संतवाडी शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री. रविंद्र आहिरे सर,   म कार्यक्रमास उपस्थित होते.