लाँकडाऊन काळात गरीबांसाठी राबतायत सुवर्णाताई ठाकरेचे मायेचे हात !!


मुरबाड : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने भारतात ही आपले हातपाय पसरले असतानाच केलेल्या लाँकडाऊन या उपाय योजनेमुळे सर्वत्र बाजार पेठा,उद्योग धंदे  पुर्णता बंद झाले आहेत. त्यामुळे धनदांडग्यांसह सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच गाठीशी असलेल्या दोन पैशात काही विकत घेवून खाऊ म्हटलं तर अन्न धान्याची,किराणा सामानाची दुकाणे बंद, अशावेळी अनेक दानशुर दाते पुढे येवून गोरगरीबांसाठी मदत करू लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे एन.के.टी.ट्रस्ट ठाणेचे डॉ. नानजीभाई ठक्कर व मुरबाडच्या स्री शक्ती सामाजिक संंस्थेच्या  समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे ह्या होत.


कोरोनाकाळात  सुवर्णाताईचे  कार्य हे वाखाणण्याजोगे आहे.ताईने आतापर्यंत माळशेज घाट माथ्याच्या पायथ्या पासुन खेडेपाड्यात,आदिवासी वाड्या, पाड्या, वस्त्यांवर ते मुरबाड कल्याणच्या सरहद्दी पर्यंत आदिवासी, मजुर, शेतकरी, विटभट्टी कामगार, पोलीस, आरोग्य कर्मचारी, एस.टी.कंडक्टर,ड्रारव्हर,मेकँनिक,सफाई कामगार,अशा शेकडो गरजुंसाठी गेल्या महिनाभरात तांदूळ, गहू, कडधान्य,साखर.चहा,साबन,सँनिटायझर,इत्यादी जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करून गोरगरीब ,आणि गरंजुंच्या.चेह-यावर  आंद पहाण्याचे भाग्य सुवर्णाताईना मिळाले असुन त्यांच्या या कार्यामुळे सर्वच स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.


मात्र यापुर्वीही अनेक गावात खेडोपाडी शाळा, काँलेज, मंदिरेnयांसारख्या ठिकाणी शेड उभारणी, फ्लोरींगसाठी लाद्या, कुठे पाण्याच्या सिंटेक्स टाक्या, तर कुठे पाणी टंचाई ग्रस्त भागात बोअरवेल तर महिला बचतगट, महिला मंडळांसाठी साड्या, विद्यार्थ्यांसाठी युनिफाँर्म दफ्तरे, वह्या, पुस्तके, असे भरीव योगदान देण्याचे काम करणा-या व अन्याय ग्रस्तांसाठी मदतीचा हात देणा-या  सुवर्णाताई ठाकरे ह्या एकमेव  आणि पहिल्याच महिला कार्यकर्त्या आहेत.



Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image