सॉलिटर "ए" गृहनिर्माण संस्था, डोकाळी,  ठाणे यांचे "सॉलिड" काम


कोरोनाच्या महामारीत सॉलिटर "ए" गृहनिर्माण संस्था, डोकाळी,  ठाणे यांचे "सॉलिड" काम


ठाणे विभागातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध वकील श्री. अलकेश कदम व त्यांचे सहकारी 
श्री. सौरभ मेघारे, श्री. दीपक भारद्वाज, श्री. संतोष गुरव, श्री. प्रसाद चौघुले, श्री. स्वप्नील परब, श्री. समीर पांचाळ व त्यांचा इतर सर्व स्थानिक रहिवाशी यांच्या मदतीने " गोरगरीब, अंध, अपंग, बेवारस व्यक्तींना मोफत ०२ महिन्याचे रेशन देण्याचे काम केले. आता पर्यंत किमान ५०-६० गोर गरीब व्यक्तींना या उपक्रमाचा फायदा झाला.
सदर उपक्रम कोणत्याही प्रकारची गर्दी न होता,प्रशासनाचे नियम तंतोतंत पाळून पार पाडण्यात आला.
समाजसेवेचे हे कार्य अविरत चालू राहणार आहे.


सर्व सामाजिक उपक्रमात "सॉलिटर" सोसायटी नेहमीच अग्रेसर असते. आमच्या या कार्यातून इतर गृहनिर्माण संस्थाना देखील प्रेरणादायी ठरेल असा विश्वास ऍड. अलकेश कदम यांनी बोलून दाखवला.