बेलापूर परिसरात YMCA च्या माध्यमातून गरजूंना 50 रेशन किटचे वितरण


नवी मुंबई : आग्रोली, शहाबाज व बेलापूर परिसरात आग्रोली गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन गरजूंना 50 किटचे वितरण करण्यात आले.


रेशन किटमधील साहित्य
तांदूळ - ५ किलो
गव्हाचे पीठ - 10 किलो
तूरडाळ - १ किलो
साखर - १ किलो
चहा पावडर - १/४ किलो
हळद - १०० ग्राम
मिरची मसाला - १०० ग्राम
मीठ - १ किलो
तेल - १ लिटर
आंघोळीचा साबण - १ नग


सदरील किट साठी RSCD संस्थेच्या चेतनभाऊ वाघ ह्यांनी पुढाकार घेऊन YMCA संस्थेच्या अलियन कोटीयन, समन्वयक सना शेख ह्यांच्या माध्यमातून मिळाले.


आता पर्यंत 110 कुटुंबाना रेशन किट, 500 गरजवंतांना फूड पॅकेट, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम आम्ही जमा केली आहे.


किट वितरण वेळी सानू डॅनियल, आदित्य सिंग, मनोज डोंगरे, विनय पाटील, महेश मोकल, समीर मोहिते, जयेश भोईर, दिनेश माळी, प्रणय ठाकूर, आशिष वैद्य, सत्यम पवार, राजू भोईर, फरहान चौधरी, गिरीशा वाघ व चेतन वाघ हे प्रामुख्याने उपस्थित होते.