शिवसेना मुरबाड शहरच्या वतीने नगरपंचायत कर्मचाऱ्यांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप !!


मुरबाड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राणपणाने  कर्तव्य बजावुन आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणा-या कामगारांना दिलासा देवून त्यांच्या कार्याचे कुठेतरी कौतुक व्हावे, या द्रुष्टीने शिवसेना शाखा मुरबाड शहरच्या वतीने आज मुरबाड नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना जिवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात देवून त्यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.याप्रसंगी मुरबाड पोलिस स्टेशन चे बिट हवालदार, महेश डोईफोडे, हवालदार भोसले, पत्रकार नामदेव शेलार, पत्रकार. मंगल डोंगरे तसेच शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक  उपस्थित होते.


मुरबाड शहर आणि शिवसेना यांचं एक.अतुट असे नाते असुन, मुरबाड करांच्या सुखदुख:त शिवसेना नेहमीच सहभागी असते,मग प्रसंग. कुठलाही असो.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दरम्यान च्या काळात शिवसैनिकांनी स्वतःची पदरमोड करत संपूर्ण शहरात सँनिटायझर फवारणी केली. घरोघरी मोफत  सँनिटायझर वाटप,लाँकडाऊनच्या काळात. नागरीकांची गैरसोय होवु नये म्हणून घरपोच स्वस्त  दरात भाजीपाला पुरवणे,तसेच गरीब गरजु लोकांना जवळपास एक  ते दिड हजार कुटुंबियांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले,मात्र  शहरवासियांच्या आरोग्याची काळजी घेणा-या नगरपंचायत कर्मचाऱ्यां बाबत मनात आस्था असल्याने शिवसेना मुरबाड शहर प्रमुख राम भाऊ दुधाळे यांना स्वस्थ राहण्यात स्वारस्य वाटत नव्हते.कारण आपला जिव धोक्यात घालून शहरातील नागरिकांसाठी केवळ आपली ड्युटी न करता चोवीस चोवीस तास राबणा-या कामगारांना त्यांच्या कामाबद्दल कुठेतरी शाबासकी द्यावी. त्यांचं कौतुक करावं,असे सतत मनात विचार असतांना, सद्याची वेळ हि शाळ,श्रीफळ देवून सत्कार करण्याची नाही. हे ध्यानात घेवून रामभाऊनी नेमकी आजची सर्वांची अडचण लक्षात घेवून ,या सर्व कामगार मित्रांना दैनंदिन जिवनात लागण-या जिवनावश्यक वस्तुंचे किट देवून त्यांचे आज मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोशियल डिस्टंसिंग ठेवून,किट वाटप करण्यात आले.