मुरबाड नगर पंचायतच्यावतीने दिव्यांगाना धनादेश व किटचे वाटप  


मुरबाड : मुरबाड नगर पंचायत हद्दीत असणा-या दिव्यांगाना आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाकडुन दिव्यांग निधीतुन देण्यात येणारे अनुदान व आमदार कथोरे तसेच नगर पंचायत च्या वतीने जिवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यात आले..       


यावेळी मुरबाड नगरपंचायत वतीने नगरपंचायत हद्दीतील 65 दिव्यांगांना प्रति पाच हजार रुपये चे धनादेश व जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले, कोव्हीड -19 काळात दिव्यांगांना  नगरपंचायत  दिव्यांग सहायता निधी तुन नव्या आर्थिक वर्षातील निधीतून  हे धनादेश वाटप केल्याने त्यांच्या वरील आर्थिक संकट टळल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. 


याप्रसंगी  आमदार किसन कथोरे, तहसीलदार अमोल कदम, नगर पंचायतचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ  नगराध्य्क्षा छाया चौधरी, उपनगराध्यक्षा अर्चना विशे यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. तर यावेळी बहुसंख्य नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.