मावळी मंडळ ठाणे यांच्याकडून १० लाखांची मदत


धनादेश देताना डावीकडून संस्थेचे विश्वस्त श्री जोसेफ फर्नांडीस, उपाध्यक्ष श्री सुधाकर मोरे, अध्यक्ष श्री कृष्णा डोंगरे


ठाण्यातील ९५ वर्षे क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली श्री मावळी मंडळ संस्था गेली ७० वर्षे शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. परंतु या वर्षी आपल्या देशावर आलेल्या करोना विषाणूच्या संकटामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. संस्थेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा जमा निधी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व स्थलांतरित गरीब कामगार वर्गासाठी मुख्यमंत्री फंडांमध्ये रू.१०लाखांचा धनादेश ठाणे जिल्हाधिकारी मा. श्री. राजेश नार्वेकर ह्यांच्याकडे सुपूर्द केला...


धनादेश देताना डावीकडून संस्थेचे विश्वस्त श्री जोसेफ फर्नांडीस, उपाध्यक्ष श्री सुधाकर मोरे, अध्यक्ष श्री कृष्णा डोंगरे