व्हेंटिलेटर वाचून चालतेय मुरबाडची आरोग्य यंत्रणा


मुरबाड : मुरबाड तालुक्यात नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी 2 ग्रामीण रुगणालये, सहा आरोग्य केंद्रे आणि 27प्राथमिक आरोग्य केंद्रे व्हेंटिलेटर वाचून आरोग्य यंत्रणा चालत असल्याचे उघडकीस आले आहे. खरं तर व्हेंटिलेटर म्हणजे काय असतंय रे भाऊ.  हे इथल्या जनतेला माहितच नसुन      मुरबाड तालुक्यात आरोग्य, शिक्षण व पिण्यासाठी पाणी ह्या तिन सुविधा सर्व सामान्य जनतेला अजुन पर्यंत तरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करण्यात राजकीय नेत्यांना यश आले नाही.रावा पासुन रंका पर्यंत गरज असलेली रुग्णालयांची अवस्था आहे तशीच आहे टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात ई.सी.जी.मशीन बंद आहे. मुरबाड शहरातील रुग्णालयातील ई.सी.जी.मशीन बंद आहे. तर दोन्ही रुग्णालयात एक्सरे मशीन उपलब्ध नाहीत. असे असताना व्हेंटिलेटर ची अपेक्षा ठेवणे म्हणजे एक प्रकारचा विनोदच ठरेल, तालुक्यात टोकावडे, मुरबाड आरोग्य रूग्णालये आहेत, तर सहा प्राथमीक आरोग्य केंद्रे असुन सत्तावीस प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, खेदजनक बाब म्हणजे अत्यावश्यक असलेली व्हेंटिलेटरची सुविधा कोणत्याही रुग्णालयात नाही, परिणामी ह्रदयविकाराचा रुग्ण, अपघात, सर्पदंश, रक्तदाब असे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असता त्यांना कल्याण, ठाणे, मुंबई अशा‌ ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात येते शेवटी अशा दुरच्या ठिकाणी पोहचण्या अगोदर रुग्णाला मृत्यू गाठतो. खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटर आहे, पण तिथे वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा वापर करून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळतात तसेच रक्त तपासणी सुध्दा शासकीय रुग्णालयात न करता खाजगी लॅब मधुन करण्यात येत
असल्याने रूग्णांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. म्हणून आरोग्य, शिक्षण व पिण्यासाठी पाणी ह्या सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शासन यंत्रणेने प्राधान्य देण्यात येते.आजच्या कोरोना सारख्या आजाराची लागण झाल्यास उपचारा अभावी मरण परवडले असे म्हणून प्राण सोडण्यात धन्यता मानावी लागेल.अशीच अवस्था मुरबाड करांची आरोग्या बद्दल असल्याची खंत नागरिकांकडून बोलली जात आहे.