ताप सर्वेक्षण बाह्यरुग्ण कक्ष तातडीने सुरू करण्याचे महापालिका आयुक्त ‍विजय सिंघल यांचे खाजगी रुग्णालयांना आदेश


ठाणे : कोविड19 या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये तातडीने ताप सर्वेक्षण  बाह्यरुग्ण कक्ष तातडीने सुरू करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी तथा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनास दिले आहेत.


महापालिका कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण रुग्णांलयानी करावयाचे आहे. वर्गीकरण 1 मध्ये जे नागरिक गेल्या 28 दिवसात परदेशातून आलेले आहेत, त्यांची तपासणी करावयाची आहे. यासाठी शासकीय रुग्णालय- ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, कौशलय मेडिकल फाऊंडेशन-पाचपाखाडी, ज्युपीटर लाईफ लाईन हॉस्पीटल, होरायजन हॉस्पीटल- घोडबंदर, बेथनी हॉस्पीटल, जितो हॉस्पीटल, वेदांत हॉस्पीटल घोडबंदर रोड, रेहमानीया हॉस्पीटल, काळसेकर हॉस्पीटल,  कौसा मुंब्रा येथे तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


वर्गीकरण 2 मध्ये परदेशी प्रवास करुन आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी व वर्गीकरण 3 मध्ये ज्यांना कफ, घसादुखी, थंडी वाजणे अशी लक्षणे आढळणाऱ्यां रुग्णांचे वर्गीकरण करुन खाजगी रुग्णालयांनी तपासणी करावयाची आहे, यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील कौशल्या मेडिकल फाऊंडेशन, क्रिटीकेअर सुपरस्पेशॅलिटी हॉस्पीटल, ठाणे हेल्थ्‍ केअर, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पीटल, रेहमानीया हॉस्पीटल, बेथनी हॉस्पीटल, मेट्रोपोल मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पीटल-एलएलपी, सिध्दीविनायक मॅटनिर्टी ॲण्ड जनरल हॉस्पीटल, वेदांत हॉस्पीटल-घोडबंदर रोड, हायलॅण्ड सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटल, जिथो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट्, काळसेकर हॉस्पीटल-मुंब्रा, कोपरी हेल्थ सेंटर, शिवाजीनगर हेल्थ सेंटर-पडवळनगर वागळे इस्टेट, आयुर्वेदिक डिस्पेन्सरी-दादोजी कोंडदेव स्टेडियम, मानपाडा हेल्थ सेंटर, शिळ हेल्थ सेंटर- शीळफाटा, कौसा हेल्थ सेंटर, लोकमान्य कोरस हेल्थ सेंटर- लोकमान्यनगर, रोझा गार्डनिया – कासारवडवली, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय- कळवा, शासकीय रुग्णालय ठाणे येथे सु‍विधा उपलब्ध करण्यात आली आहे.


कोविड 19 या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाने राज्यभर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून महापालिका आयुक्त यांना सक्षम प्रा धिकारी घोषित करण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यत एकूण 14 कोरोना कोविड 19 रुग्णांचे निदोन झाले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क आणि लो रिस्क रुग्णांच्या तपासणी सुरू आहेत. तसेच ज्या खाजगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा आदी प्रकारच्या तक्रारी आहेत अशा रुग्णांना स्वतंत्र बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी किमान 1 ते दीड मीटर अंतरावर उभे करुन त्यांची तपासणी करावी यापैकी संशयित कोरोना कोविड 19 रुग्णांना ‍निदान व उपचार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना खाजगी रुग्णालयांना ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.


तसेच संश्‍यित कोरोना कोविड 19 रुग्णांपैकी ज्या रुग्णांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय वैद्यकीय तज्ञांना आलेला असेल अशा रुग्णांच्या तपासण्या करुन निश्चीत निदान करणेसाठी शासनमान्य तपासणी  केंद्राकडे अथवा मान्यताप्राप्त  प्रयोगशाळेकडे पाठवावे. तसेच दैनंदिन तपासणी केलेल्या रुगणांपैकी कोरोना कोविड 19 संशयित अथवा बाधीत रुग्णांची यादी  ठाणे महापालिकेच्या tmchqncov2019@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याबाबतच्या सूचना देखील खाजगी रुग्णालयांना ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात येत आहेत.