अवैद्यरित्या दारुविक्री करणाऱ्या वाशी येथील संजोग बार वर पोलिसांचा छापा


नवी मुंबई : वाशी, नवी मुंबई-येथील 'संजोग हॉटेल बार अँड फैमिली रेस्टॉरेंटमध्ये अवैद्यरित्या दारुविक्री करीत असल्याची खबर वाशी पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर बारवर छापा टाकून दारू विक्री करताना व्यवस्थापक व ३ वेटरांना ताब्यात घेण्यात आले.


याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात  गुन्हा रजि. नं.१६८/२०२०,मुंबई दारुबंदी अधिनियम कलम 65(इ),भादवि कलम 188,269,270 महा. कोविड 19, उपाययोजना , २०२० कलम 21 तसेच सार्वजनिक रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे


या छाप्यात विविध कंपनीचे विदेशी मद्यसाठा त्याची किंमत १,३१,७५०/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला


सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त,परिमंडळ-१,नवी मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त ,वाशी विभाग, विनायक वस्त,वपोनि संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पो.उपनि सोपान राखोंडे, पो.ह.डांगे, पाटील, पो.ना. अहिरे, सोनावणे व जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.