चिखली – जाधववाडी चिखली येथे रंजन वजन काट्याजवळ एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली.
अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जाधववाडी येथील रंजन वजन काट्या जवळ असलेल्या एका लाकडाच्या गोडाऊनला आग लागली.
ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
अग्निशमन विभागाला माहिती मिळताच चार बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.