मुरबाड नगरपंचायतच्यावतीने कोरोना ग्रस्तांसाठी रक्तदान शिबिर संपन्न


मुरबाड :  मुरबाड तालुक्यातुन दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर मुरबाड नगरपंचायत च्या वतीने आज मुरबाड पंचायत समिती च्या इमारतीत कोरोना ग्रस्त रुग्णासाठी रक्तदान शिबिर  आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 103 रक्त दात्यानी सहभाग घेतला. या वेळी नगराध्यक्षा छाया चौधरी, नगरसेविका साक्षी चौधरी, मुख्यधिकारी परितोष कंकाळ, सहाय्यक अधिकारी देवकर,  माजी नगराध्यक्ष मोहन सासे,उपनगराध्यक्षा  अर्चनाताई विशे, नगरसेवक संतोष कोळेकर, बाबू चौधरी, आदी मंडळी उपस्थित होते मुरबाड नगरपंचायत कडे जागा उपलब्ध नसल्याने गटविकास अधिकारी  विश्वनाथ केळकर यांनी नगरपंचायत मुरबाड याना पंचायत समिती ची इमारत उपलब्ध करून दिली. याबद्दल मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांनी आभार मानले. मुरबाड तालुक्यातुन पहिल्यांदा राज्यात कोरोना ग्रस्तांना मदत म्हणून रक्तदान शिबिर पंचायत समिती मुरबाड यांनी आयोजित केले होते त्यावेळी सुद्धा मुरबाड मधून 125 रक्त दात्यांनी सह भाग घेतला होता.


मुरबाड मधून अजून सरळगाव, म्हसा, धसई या बाजारपेठाच्या गावात रक्तदान शिबिर लावले जातील असे यावेळी भाजप तालुकाध्यक्ष  जयवंत सूर्यराव यांनी सांगितले रक्ताची गरज असल्याने जास्तीत जास्त रक्तदाते आपल्या तालुक्यातील असले पाहिजे असा मानस त्यांनी व्यक्त केला टाटा मेमोरियल रक्त पेढीने आज मुरबाड नगरपंचायत च्या रक्त संकलन केले या रक्तपेढी चेही मुरबाड नगरपंचायतचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांनी आभार मानले तर संचारबंदी काळात, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना करत आज रक्तदान शिबिर सम्पन्न झाले मुरबाड शहरात अनेक अफवा उठल्या मात्र मुरबाड आजही सुरक्षित असून जनतेकडून होणारे सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानत मुरबाड जिकणार कोरोना हरणार यासाठी मुरबाड नगरपंचायत सर्व उपाययोजना राबविणार असल्याचे यावेळी सांगितले.