डोंबिवलीच्या कोरोना पॉझिटिव्ह तरुणाने खासगी गाडीने गाठलं कस्तुरबा रुग्णालय...


कल्याण - डोंबिवलीकरांसाठी काहीच अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्याच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे


डोंबिवलीच्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला केडीएमसी आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णवाहिका नसल्यानं हा तरुण स्वतःच्या गाडीने चालक आणि आईवडील यांच्यासह कस्तुरबा रुग्णालयात गेला. तिथे गेल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं, मात्र त्याच्या आई वडिलांना चाचणीही न करता पुन्हा माघारी धाडण्यात आलं असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती तरुणाला देण्यात आली. हा शासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप तरुणाने केला आहे. सोबतच माझ्या एका चुकीमुळे मी इथे असून तुम्ही अशी चूक करू नका, असं आवाहनही या तरुणाने केलं आहे. या तरुणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.


डोंबिवलीमध्ये आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळलाय...


हा ही रुग्ण त्या लग्नाला गेला होता ज्या लग्नामुळे डोंबिवली मधील काही परिसर सील केलेत. काही जणांना होम क्वारनटाईन केलं गेलय. मात्र या रुग्णाला पालिकेने कस्तूरबा हाॅस्पिटलला जायची व्यवस्था केली नसून करोना बाधित रुग्णाला चक्क खाजगी वाहनातून कस्तूरबाला पाठवले आणखी धक्कादायक म्हणजे या करोना बाधित रुग्णासोबत त्याचे कुटूंब देखील करोना बाधित चाचणी करता कस्तूबा रुग्णालयात गेले होते पण त्यांना त्यांची चाचणी न करताच घरी परत पाठवले गेले ज्यामुळे करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांना असं सोडणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.


कल्याण डोंबिवलीत करोना बाधितांची संख्या वाढत जातेये मात्र प्रोटेकश्न कीट नसलेल्या आणि वेंटिलेटर नसलेल्या एम्ब्युलन्स केडीएमसीकडे आहेत तर काहीच डाॅक्टर आणि नर्सेस कोरोना टीम मध्ये असून कल्याण डोंबिवली करता एकच डोंबिवली येथील शास्त्रीनगर हाॅस्पिटल आयसोलेशन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्या हाॅस्पिटलची दुरावस्था म्हणजे तिथे पेशंट बरा व्हायच्या ऐवजी आणखी आजारी पडेल अशी आहे.


केडीएमसीचे सर्व अधिकारी कर्मचारी जीव तोडून काम करत आहेत यांत तीळमात्र शंका नाही. मात्र एकाच खात्यात वर्षानुवर्षे काम काम करणा-यांनी विशेष करुन आरोग्य खात्यात काम करणा-यांना कल्याण डोंबिवलीकरांसाठी काहीच अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्याच नसल्याचे नागरिकांकडून, पेशंटकडून सांगण्यात येत आहेत. आतातरी फेसबुक वरून live देणारे आयुक्त डॉ.सूर्यवंशी याकडे लक्ष देणार का हे पाहावे लागेल.