कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी नवीन संकेतस्थळाची निर्मिती


मुंबई – कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांच्या माहितीसाठी नवीन संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना या सर्वाची एकत्रित, अधिकृत व खात्रीशीर माहिती या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध होणार आहे.


mahainfocorona.in या संकेतस्थळाला भेट देऊन राज्यातील कोरोना विषयीची अद्यावत माहिती मिळवता येणार आहे. यामध्ये कोरोना संसर्गाची जिल्हानिहाय सद्यस्थिती जाणून घेता येणार आहे. तसेच राज्य सरकार द्वारे विविध ठिकाणी करण्यात आलेली रात्र निवारे, भोजनालय या सुविधांची माहिती घेता येणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी क्यूआर कोड पण उपलब्ध करून देण्यात आला आहे.