मुंबई – कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवित असणारे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस, पत्रकार यांना मराठी कलाकारांनी ‘तु चाल पुढं’ या गाण्याद्वारे मानवंदना दिली आहे.
तब्बल बत्तीस कलाकारांनी घरबसल्या व्हिडिओचे शूटिंग करून हे गाणं तयार केला आहे.
मूळ कुंकू चित्रपटातले हे गाणं समीर विध्वंस यांच्या डबल सीट सिनेमात वापरण्यात आलं होतं आणि अजय गोगावले यांनी याचे गायन केले होते.
या गाण्यात तब्बल ३२ कलाकार सहभागी झाले आहेत. याच्यात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जीतेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मुक्ता बर्वे, अभिनय बेर्डे, स्पृहा जोशी, जसराज जोशी, चिन्मय मांडलेकर आदी कलाकारांचा यात समावेश होतो. प्रत्येकाने आपल्या घरातूनच हा व्हिडिओ केला आहे.
संपूर्ण गाण्यात या कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांचे फोटोज वापण्यात आले आहेत. आणि गाण्याच्या सरशेवटी सगळ्यांना मराठी इंडस्ट्रीकडून सलाम ठोकण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी कलाकारांनीही मुस्कुराएगा इंडिया या नावाने गाणं केलं होतं. त्यात अक्षयकुमार, टायगर श्रॉफ, विकी कौशल, सिद्धार्थ मेनन, क्रिती सेनन आदी कलाकार सहभागी झाले होते.