शिवभोजन थाळी - वाटसरूची भूक भागणार


मुरबाड नगरपंचायत हद्दीत 1 एप्रिल पासून शिवभोजन थाळी सूरु करण्याचा त्री सदस्य समितीचा निर्णय : वाटसरू ची गरज भागणार


 मुरबाड : मुरबाड तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून  संचारबंदी काळात गावाकडे पायी जाणाऱ्या ची संख्या वाढत असून मुरबाड मधील कुणबी समाज हॉल, नमस्कार हॉल, तसेच तळवली आश्रम शाळेत  आश्रयाला असलेले वाटसरू पहात  कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असाल तिथे रहा सुखरूप रहा, या पाश्र्वभूमीवर त्यांची व्यवस्था होत असताना मुरबाड नगरपंचायत हद्दीत 1 एप्रिल असून शिवभोजन थाळी चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्री सदस्य कमिटीचे चे सदस्य सचिव व मुख्यधिकारी परितोष कंकाळ व तिसरे सदस्य गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी दिली, या कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल कदम हे याची घोषणा करणार असल्याचे या दोघांनी सांगितले.


मुरबाड शहरात अनेक कामगार, वाटसरू यांची उपासमार होऊ नये तसेच शहरात आश्रयास असलेल्या वाटसुरू ची गैरसोय होऊ नये म्हणून या शिवभोजन थाळी चे आयोजन करण्यात आले असून सदर थाळी पाच रुपयात उपलब्ध होणार असल्याचे कंकाळ यांनी सांगितले यामुळे नागरिकांनी कुठेही न फिरता कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे 


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image