वासनेपुढे बाप झाला अंध - सात वर्ष बलात्कार


बारामती - वासनेपुढे अंध झालेल्या नराधमानं बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणार कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 


बापाने पोटच्या मुलीवरच वारंवार बलात्कार केल्याची घटना बारामती शहरात ही घटना घडली. 


याप्रकरणी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत बारामती शहर पोलिसांनी अटक केली.आरोपीला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सातवीत शिकत होती. त्यावेळी तिचं वय १३ वर्ष होतं. पीडितेला मासिक पाळीदरम्यान त्रास होत होता. एक दिवस पीडितेची आई कामानिमित्त बाहेर गेलेली असताना बापानं मुलीला तुझ्या पोटात दुखतं, त्याच्यावर माझ्याकडे उपाय आहे, असं सांगितलं. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला.


त्यानंतर नराधम बापाने मुलीलाच वासनेची शिकार वारंवार बलात्कार केला. २०१३ ते १९ मार्च २०२० या काळात पीडितेवर आरोपीनं सातत्यानं अत्याचार केले. 


बापाकडून वारंवार होणाऱ्या शोषणाला कंटाळून पीडितेनं मंगळवारी बारामती शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.


संवेदनशील घटना असल्याचं लक्षात येता शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 


या प्रकरणाचा तपास सध्या एपीआय अश्विनी शेंडगे करीत आहेत.


Popular posts
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image