लोहमार्गावरुन चालू नका ; मध्य रेल्वेचे आवाहन


मुंबई – लॉकडाऊनच्या कालावधीत जे नागरिक पायी गाव गाठत आहेत.त्यातील बहुतांश रेल्वेच्या लोहमार्गाने चालत जात आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथे मालगाडीच्या धडकेत गंभीर अपघात देखील झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेच्या लोहमार्गाने जाऊ नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. मात्र, या कालावधीत मालवाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. देशभर आवश्यक साहित्य, वस्तू पोहोचविण्यासाठी मालगाड्या, लर्सल रेल्वे धावत आहेत.


भारतीय रेल्वेने देशभर ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिक, पर्यटक, भाविक, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेची व्यवस्था केली आहे. या रेल्वेगाड्या दोन्ही राज्यांच्या सहमतीने (ज्या राज्यातून निघणार, ज्या राज्यात पोहोचणार) चालवली जात आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय रेल्वेकडून घोषित केलेल्याही रेल्वे धावत आहेत.


उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी राज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे धावत आहेत. मालगाडी, पार्सल, विशेष रेल्वे, श्रमिक रेल्वे यांची सेवा सुरू आहे. लोहमार्ग आणि मार्गाच्या आजूबाजूने चालणे धोक्याचे आहे. 


याबाबत रेल्वेकडून जागरूकता अभियान राबविले जात आहे. नागरिकांनी लोहमार्गाने जाऊ नये असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image