१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व लाईन्स व्यस्त असल्या तरी स्टेल्लारीया स्टुडिओस प्रस्तुत अमोल उतेकर यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला तसेच किरण खोत यांच लेखन असलेला एक व्हिडिओ आपल्या भेटीला आला आहे.
कोविड- १९ ने सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे. नुसतच शहरात नाही तर प्रत्येकाच्या मनात, घरात अशांततेचा कल्लोळ पसरवला आहे. प्रत्येक जण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी झटताना दिसतोय.
आपल्यातीलच देव मग ते खाकी वर्दीतील पोलिस असो वा डॉक्टर परिचारिका असो आज आपल्यासाठी हे दिवस रात्र झटत आहेत. सोशल मीडिया वर विविध कला क्षेत्रातील कलाकारांनी निरनिराळ्या व्हिडीओच्या माध्यमातून सोशल डिस्टेंसिंग त्याचप्रमाणे स्वतःची काळजी कशा प्रकारे घेता येईल याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत.
मात्र सोशल डिस्टेंसिंग सोबतच पोटाची खळगी भरायला आवश्यक अशी गोष्ट म्हणजेच पैसे त्याची मात्र आपल्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सेवेकरूंना कमतरता भासू नये. मग त्या कामवाल्या मावशी असो किंवा आपला प्रवास सुखकर करणारे चालक त्यांना उपाशी झोपायला लागू नये याची काळजी घेण हे आपलं आद्य कर्तव्य असायला हवं.
अशी विनंती मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, राणी अग्रवाल, गौरव मोरे, नीता शेट्टी, अमोल उतेकर, प्रदीप मेस्त्री या व्हिडिओच्या मार्फत नागरिकांना करत आहेत.