राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 'मुख्यमंत्री' सहाय्यता निधी'ला १ कोटीची मदत


मुंबई – ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने व स्वखुशीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19’ साठी १ कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला.


कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्यावतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील २ हजार ५००
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने व स्वखुशीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19’ साठी १ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. या जमा केलेल्या मदतीचा धनादेश आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपुर्द केला.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.


Popular posts
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image