मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली, इकबाल चहल नवे आयुक्त


मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. 


आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून UDD चे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. 


तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैसवाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 


प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे