राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एक ठार


पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी हद्दीतील मयूर पेट्रोल पंप-भारती विद्यापीठ रोड जवळ अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे.


सदर अपघात आज गुरुवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत  दुचाकीचालक जागे वरच ठार झाला.दरम्यान दुचाकी चालकाचे नाव  समजू शकले नाही.


घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उजळाई वाडी महामार्ग पोलीसांनी पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सीपीआर रुग्णालयात पाठवीला  आहे.