मुंबई - येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कारखान्याला आज संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास भीषण आग लागली.
चिंचपोकळी येथील अनंत मालवणकर मार्गावरील बावला कंपाऊंड येथे हा कारखाना आहे.
प्रथम एका झाडाजवळ आग लागली. त्यानंतर ती विजय खातू यांच्या कारखाना परिसरात पसरली.
यावेळी प्रसंगावधान दाखवत जे लोक होते त्यांनी बाहेर धाव घेतली.
या आगीत विजय खातू यांच्या कारखान्याचे नुकसान झाले आहे. तसंच रेश्मा खातू यांच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे.
अनंत निवास या इमारतीच्या रहिवाशांना प्रचंड धुराचाही सामना करावा लागला.
अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेतली आणि ही आग नियंत्रणात आणली.
कुलिंग प्रक्रियाही तातडीने सुरु करण्यात आली आहे.