क्वारंटाईन सुविधेचा व परिस्थितीचा घेतला आढावा...
मुंबई - मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून आज याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी होती.
यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पाहणी करतानाच तिथल्या क्वारंटाईन सुविधेचा व परिस्थितीचा आढावाही शरद पवार यांनी घेतला.