सार्वजनिक शौचालयाचा वापर आणि दाट लोकवस्तीमुळे कोरोना रूग्णांमध्ये वाढ


पुणे – दाट लोकवस्ती, सार्वजनिक शौचालयांचा वापर, अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेले रुग्णही बाधित निघणे, करोना बाधित असूनही सुरुवातीच्या काळात लक्षणे दिसून न येणे अशा विविध कारणांमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याचे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


तर, महापालिकेच्या पंधरापैकी पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील रुग्ण कमी करण्यासाठी तगड्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तरीही कोरोना वाढतच आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठेत, ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता, येरवडा-कळस-धानोरी व कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालय परिसरात रोज कोरोनाचे रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.


या भागातील लोकांची तात्पुरती राहण्याची सोय म्हपालिकेच्या शाळा, मंगलकार्यालय, वसतिगृहात करण्यात आली आहे. मात्र, नागरिक तिथे जाण्यास फारसे काही उत्सुक नाहीत. या लोकांना राहण्यासाठी जाताना स्वतः जेवणाची सोय करावी लागणार आहे. पण, नागरिक म्हणतात केवळ राहण्यासाठी का जायचे, त्यांना तिथे जेवणही हवे आहे.


दरम्यान, सार्वजनिक शौचालयाची रोज स्वच्छता ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. तर


पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. हे प्रमाण लवकरच वाढून कोरोनाच्या रोज १५०० चाचण्या करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.