भारतीय मराठा महासंघाच्या कोणत्याही मागण्या शिवसेना सहानुभुतीपुर्वक सोडवेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय मराठा महासंघाचे शिवसेनेला अगदी पुर्वीपासून सहकार्य आहे.शिवसेनेने मराठा समाजाच्या मागण्या बाळासाहेब असतानाही  अनेकवेळा मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ होऊ शकले आहे.त्यामुळे इथुन पुढेही काही सूचना असल्यास त्या सहानुभूतीपुर्वक शिवसेना सोडवेल..त्यामुळे आत्ता जसे तुम्ही सहकार्य करीत आहात तसेच यापुढेही सहकार्य करा असे आश्वासन भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाला राज्याचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांनी दिले आहे.आज भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात मुंबईतील पुरातन बंगला येथे राज्याचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.या भेटीदरम्यान भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डा.आप्पासाहेब आहेर,सरचिटणीस श्री राम शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री पी.जी.पवार,ठाणे जिल्हाप्रमुख श्री किशोर पवार,मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री सुर्याजी सोनवले,मुंबई प्रदेश अध्यक्षा  सौ.मेघाताई पानसरे, रत्नागिरी संपर्क प्रमुख श्री दिलीप चव्हाण, गोवा संपर्क प्रमुख श्री अमित नाईक,प्रसिद्धीप्रमुख श्री सचिन ठिक आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
   यावेळी भारतीय मराठा महासंघ या संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाबरोबर असलेला 1995 पासूनचा सर्व इतिहास राज्याचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्यासमोर व्यक्त केला.यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत बीजेपी वगळुन केवळ शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे.भारतीय मराठा महासंघ ही संघटना आपली आहे.परिणामी आपण आमच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेस सहभागी करुन घेतलात तर संघटना मोठी व्हावयास वेळ लागणार नाही.आणि शिवसेना जिंदाबाद होऊ शकते असा आमचा ठाम विश्वास आहे.आपणा आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सहानुभूतीपुर्वक पहाल व सत्तेत समाविष्ट करुन घ्याल अशी आमची आपणांकडे विनंती आहे.
   दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांनी पदाधिकारी यांनी आश्वासन देत म्हणाले की,भारतीय मराठा महासंघाच्या योगदान आम्हाला पुर्वीपासूनच मिळाले आहे.त्यामुळे अगदी पुर्वीपासूनच म्हणजे बाळासाहेब असल्यापासूनच आम्ही मराठा महासंघाच्या विविध मागण्या मान्य करीत  आलो आहोत.त्यामुळे यापुढेही काही मागण्या अथवा सूचना असल्यास त्या पुर्ण करण्यात येतील असे आश्वासन देत इथून पुढेही भारतीय मराठा महासंघाचे सहकार्य असेच ठेवा असे म्हणाले.