३६ वर्षीय डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) रुग्णावर यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी

हृदयाची ब्लड पम्पिंगची क्षमता कमी होती, या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) म्हणतात


नवी मुंबई :- संतोष कानडे या महाराष्ट्रातील बीड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय रुग्णावर अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. या सर्जरीसाठी मृत डोनरकडून हृदय घेण्यात आले. पुणे स्थित रुग्ण संतोष यांना झालेल्या आजारामध्ये, हृदयाची ब्लड पम्पिंगची क्षमता कमी होती. याचे कारण म्हणजे, हृदयाचे मुख्य पम्पिंग चेंबर असणारी डावी झडप आकाराने वाढते व कमकुवत होते. या क्लिनिकल संज्ञेला डायलेटेड कार्डिओमॅपॅथी (डीसीएम) असे म्हणतात. दोन लहान मुलांचा पिता असलेल्या या रुग्णाच्या आजाराचे नेमके निदान होण्यापूर्वी त्यांना गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून श्वास लागत होता आणि पायऱ्या चढताना त्रास व्हायचा. वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करूनही आणि पुणे या संतोष यांच्या मूळ शहरात उपचार घेऊनही संतोष कानडे यांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांना अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.


 या केसमध्ये मुख्य तज्ज्ञ असणारे, अपोलो हॉस्पिटल्सचे सीव्हीटीएस व हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी कन्सल्टंट डॉ. संजीव जाधव म्हणाले, “डायलेटेड कार्डिओमॅपॅथी हे कार्डिओमॅपॅथीचे सर्रास आढळणारे स्वरूप आहे. या विशिष्ट रुग्णाच्या बाबतीत, हृदय केवळ १७% काम करत होते आणि त्याला तातडीने हार्ट ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. रुग्णासारखाच रक्तगट असणारी ४१ वर्षीय महिला डोनर होती. या महिलेला रस्त्यावरील अपघातामध्ये ब्रेन-डेड (कॅडव्हर डोनर) जाहीर करण्यात आले. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ६० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्ण लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांना आहे.”


ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव जाधव यांनी केले. सीव्हीटीएस सर्जन डॉ. शांतेश कौशिक, क्रिटिकल केअरचे डॉ. गुणाधार पाधी, क्रिटिकल केअरचे डॉ. अकलेश तांडेकर, डॉ. हरिदास, डॉ. सौरभ, डॉ. सनगर, अॅनेस्थेशिया आणि कार्डिऑलॉजिस्ट डॉ. तमिरुद्दीन धनावडे या स्पेशलिस्ट टीमने त्यांना मदत केली.


हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ज्यांच्यावर करण्यात आली ते संतोष कानडे म्हणाले, “माझे हृदय निकामी झाल्यामुळे जीवनाशी संघर्ष करत मी प्रतीक्षा करत होतो. मला नवीन जीवनदान दिल्याबद्दल मी ऑर्गन डोनर कुटुंबाचा व ट्रान्सप्लांट करणाऱ्या टीमचा मी अतिशय आभारी आहे.”


अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे प्रमुख व सीओओ संतोष मराठे यांनी सांगितले, “३ वर्षे इतक्या अल्प कालावधीमध्ये, आम्हाला यशस्वीपणे कामगिरी करणारे (लिव्हर, किडनी, हृदय व बोन मॅरो ट्रान्सप्लांट) पश्चिम भारतातील एक सर्वात आधुनिक ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून गौरवण्यात आले आहे. यामुळे आम्ही लक्षणीय प्रगती करत आहोत आणि स्पेशालिस्टच्या टीमच्या मदतीने उत्तम क्लिनिकल निकाल साध्य करत आहोत.”