कोपरी गावातील ग्रामस्थांनी  एक गाव एक होळी चे 3 रे वर्ष


रविवार दिनांक 8 मार्च 2020 रोजी कोपरी गावात एक गाव एक होळी साजरी झाली या चांगल्या संकल्पनेचे त्यांच्या गावाचे 3 रे वर्ष ग्रामस्थांनी प्रत्येक कोळी आगरी  गावात वर्षभरात येणारे सर्व सण, उत्सव कसे साजरे केले जातात विशेष करून कोपरी गावात सणा व्यतिरिक्त इतर सर्वच गावातील धार्मिक कार्यक्रम तसेच लग्न सोहळा हळदी समारंभ कसे साजरे केले जातात  यांचे तसेच कोपरी गावातील संपूर्ण लोकजीवनावरील परंपरा व  संस्कृती चे दर्शन घडविणारा सुंदर कार्यक्रम सर्व उपस्थित ग्रामस्थ व रहिवाश्यांच्या समोर सादर केला विशेष म्हणजे या सर्व सादरीकरणात गावातील लहान मुले, मुली ,तरुण, तरुणी,बांधव,माता,भगिनींनी स्वतः सहभाग घेतला होता हे विशेष व कार्यक्रम यशस्वी व दर्शनीय व्हावा यासाठी त्या सर्वांनीच एक महिना मेहनत घेऊन खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी केला व कार्यक्रमाच्या शेवटी हौली मातेला ग्रामस्थांनी घातलेले गाराणे गावाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी कोपरी गावातील  ग्रामस्थ किती जागरूक आहेत याचे दर्शन घडवून गेले.
सर्व कोपरी गावातील भूमिपुत्र माता, भगिनी, बांधव,  ग्रामस्थ व रहिवाशांचे हार्दिक अभिनंदन.


https://youtu.be/0M_qDiOcx58