कर्जदार, जामिनदार हक्क बचाव संघर्ष मेळावा


समता मानव सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
 ठाणे (प्रतिनिधी) : दिनांक ७ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५:३० वा. मो. ह. विद्यालय ठाणे येथे समता मानव सेवा संस्थेच्या वतीने कर्जदार, जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या मार्गदर्शन मेळावा अायोजन  कार्यक्रमाची सुरुवात करताना संस्थेचे पदाधिकारी प्रकाश कदम यांनी कर्जदार , जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष मा. अ‍ॅड. प्रसाद करंदीकर साहेब यांचे स्वागत चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत तायडे व राजाराम ढोलम यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थित नागरिकांचे स्वागत शब्द सुमनाने केले त्यानंतर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष मा. अ‍ॅड. प्रसाद करंदीकर यांनी मार्गदर्शन करताना गर्जना केली की, कर्जदार जागा हो.. संघर्ष समितीचा धागा हो, कारण शेकडो वर्षे सर्वसामान्य जनतेचे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पिळवणूक होत आलेली आहे त्यात म्हणजे आर्थिक पिळवणूक शासनाचा मूळ उद्देशच आहे की, अगदी शेवटच्या घटकापर्यंततील घटक त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सुख सुविधा पुरेशा मिळाल्या तर बाकी अडचणींशी सामना करू शकतो परंतु यासाठी सरकार, शासन कमी पडते त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नसतो शेवटी गरज भागवण्यासाठी कर्ज घेतो .
कर्ज घेणे हा काही गुन्हा नाही गरजेसाठी घेतलेले एक पाऊल असते कालांतराने कर्ज फेडण्यास मुश्कीली निर्माण होते अशा वेळी कोणताही राजकीय पुढारी, नातेवाईक, मित्र मंडळी कोणी सहकार्य करत नसतं कर्ज देणारी बँक, पतपेढी, सावकारी कर्ज अशा वेळेला कर्जदाराला एवढा हा नाहक त्रास देत असतो की शेवटी कर्जदार आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा अशा व्यक्तींना धीर, सहारा देणाऱ्या व्यक्तीची जास्त गरज असते म्हणून सन २००५ साली कर्जदार, जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आजपर्यंत १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात सर्वसामान्य जनतेतील कर्जदारांना, जामिनदारांना  आधार देण्याचे कार्य समिती करत आलेली आहे असे अ‍ॅड. करंदीकर बोलत होते, त्याच प्रसंगी त्यांनी ठाणे जिल्ह्यात असे सामाजिक कार्य सुरू व्हावं, काम तर चालूच आहे, पण मोठ्या प्रमाणात व्हावं या उद्देशाने धनाजी राघो सुरोसे यांची ठाणे जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या हिरीरीने राजेश बामणे, मधुकर मोरे, हरीश गुप्ता, सिद्धांत चासकर, मनोज गवळी, सुनील विश्वकर्मा, संतोष जंगम यांनी सहभाग दिला. शेवटी प्रकाश गुरव यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.