व्होट बँकेच्या परिसरात फवारणीसाठी देत आहेत प्राधान्य ! 


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रभाग निहाय धडक जंतू नाशक फवारणी मोहीम !


मात्र नगरसेवकांचीच या कामात प्रकाशझोतात येण्यासाठी होत आहे धडपड ! व्होट बँकेच्या परिसरात फवारणीसाठी देत आहेत प्राधान्य !                                   


कल्‍याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण पालिका क्षेत्रात पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जंतुनाशक फवारणीचा प्रभाग निहाय कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून या नियोजनानुसार प्रत्येक प्रभागात जंतूनाशकांची फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कामी पालिकेचे कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून हा कृती कार्यक्रम राबवत आहेत परंतु याही कामाचे श्रेय घेऊन आपलीच कॉलर टाईट काण्यात सर्वच नगरसेवक आघाडीवर असून काही नगरसेवक आपापल्या प्रभागातील व्होट बैंक परिसराला जंतू नाशक फवारणीसाठी प्राधान्य देत असल्याचेही या निमित्त सर्वत्र चित्र दिसत आहे .


कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनेकविध उपाययोजना करणेबाबत चे निर्णय घेतलेले आहेत. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपआयुक्‍त उमाकांत गायकवाड, सहा. आयुक्‍त गणेश बोराडे,  सहा. सार्वजनिक आरोग्‍य अधिकारी आगस्‍तीन घुटे, विलास जोशी तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग साफ-सफाई, फवारणी यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. सफाई कर्मचा-यांना येण्‍या-जाण्‍याकरीता बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, डोंबिवली, कल्‍याण येथून महापालिकेची परिवहन सेवा मोफत पुरविण्‍यात आलेली आहे. शहरात कुठेही कचरा साचून राहणार नाही याची दक्षता घेण्‍यात येत आहे. तसेच नविन भाजीपाला व दैनंदिन आवश्‍यक खरेदी ठिकाणे तातडीने साफ करुन जंतूनाशके फवारण्‍यात येत आहेत. रस्‍ते व इतर सफाई व्‍यवस्थित होत आहे. संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण, जंतूनाशक पावडर फवारणी, धुरावणी करणेसाठी ताबडतोब काही यंत्रणा बाहेरुन मागवून सुरु केलेली आहे. तसेच अग्निशमन विभागाचा गाडया सुध्‍दा घेवून फवारणी करण्‍यात येत आहे. एकुण १० प्रभागक्षेत्रात सिटीगार्ड जंतूनाशक फवारणी करीता १० मल्‍टीजेट गाडया सकाळ सत्रात व १० गाडया दुपार सत्रात दैनंदिन कार्यरत आहेत.


दि. ३०.०३.२०२० रोजी दिवसभरात पुढील प्रमाणे जंतूनाशक फवारणी/धुर फवारणी करुन घेण्‍यात आली आहे.


१/अ प्रभागक्षेत्र - सकाळ सत्रात प्र.क्र.११ बल्‍याणी, मोहिलीगांव संपूर्ण, उंभर्णीगांव संपूर्ण परिसर व दुपार सत्रात प्र.क्र.११ बल्‍याणी एनआरसी कॉलनी संपूर्ण परिसरात सिटीगार्डद्वारे फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र.७ अटाळी, आंबिवली, प्र.क्र.११ बल्‍याणी मोहिलीगांव परिसरात धुरफवारणी करण्‍यात आली. प्र.क्र.१३ मोहने गाव या परिसरात नाशिक पॅट्रन ट्रक्‍टरद्वारे फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र.६ वडवली, प्र.क्र.७ अटाळी आंबिवली, प्र.क्र. ८ मांडा पश्चिम, प्र.क्र.९ मांडा पूर्व, प्र.क्र. १० गणपती मंदिर टिटवाळा, प्र.क्र.११ बल्‍याणी, प्र.क्र. १२ गाळेगाव, प्र.क्र. १३ मोहने गावठाण, प्र.क्र.१४ मोहने कोळीवाडा, प्र.क्र.१५ शहाड येथे हॅण्‍ड स्‍प्रेपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली.


२/ब प्रभागक्षेत्र - सकाळ सत्र वायलेनगर येथील परिसरात सिटीगार्डद्वारे फवारणी व धुर फवारणी करण्‍यात आली असून प्र.क्र.१२ मध्‍ये हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र. १६ मिलींदनगर मध्‍ये नाशिक पॅट्रन टॅक्‍ट्ररद्वारे फवारणी करण्‍यात आली.


३/क प्रभागक्षेत्र - सकाळ सत्रात फडके मैदान व रोहिदासवाडा परिसरात सिटीगार्डद्वारे जंतूनाशक फवारणी व हॅण्‍ड स्‍प्रेपंपद्वारे फवारणी तसेच धुरफवारणी करण्‍यात आली. नाशिक पॅट्रन ट्रॅक्‍ट्ररद्वारे फडके मैदान परिसरात फवारणी करण्‍यात आली.


४/जे प्रभागक्षेत्र - प्र.क्र. ३९ अशोकनगर, प्र.क्र.४० शिवाजी नगर, प्र.क्र.४१ कोळशेवाडी, प्र.क्र. ४२ लोकग्राम, प्र.क्र.४३ मेट्रो मॉल, प्र.क्र.४५ कचोरे, प्र.क्र. ८९ मंगल राघो नगर, प्र.क्र.९० चिकणीपाडा, प्र.क्र.९१ जरीमरी नगर, प्र.क्र.९३ लक्ष्‍मीबाग येथील परिसरात हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली. तसेच प्र.क्र. ४२ लोकग्राम व प्र.क्र.९४ आनंदवाडी, प्र.क्र.३९ अशोक नगर मधील परिसरात नाशिक पॅट्रन ट्रक्‍टरद्वारे फवारणी करण्यात आली. प्र.क्र.९२ कोळशेवाडी, प्र.क्र.९४ हनुमान नगर मधील परिसरात नाशिक पॅट्रन ट्रॅक्‍टरद्वारे फवारणी करण्‍यात आली.


५/ड प्रभागक्षेत्र- येथे सकाळ सत्रात प्र.क्र. १०२ भगवान नगर, प्र.क्र.१०० तिसगाव परिसर सिटीगार्डद्वारे फवारणी केली असून प्र.क्र. १०४ खडेगोळवली, प्र.क्र.८७ शास्‍त्रीनगर, प्र.क्र.१०९ हनुमान नगर, प्र.क्र.९५ नेहरू नगर, प्र.क्र.८८ संतोष नगर, प्र.क्र. १०३ कैलास नगर या प्रभागात हॅण्‍ड पंपद्वारे फवारणी केली. प्र.क्र. १०२ भगवान नगर व प्र.क्र. १०० तिसगांव येथे धुर फवारणी करण्‍यात आली.


६ /फ प्रभागक्षेत्र- पेंडसेनगर गल्‍ली क्र. ३ पासून शेलार चौक, राजगुरुनगर इंदीरानगर परिसरात सिटीगार्ड मार्फत जंतूनाशक फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र.४६ खंबाळपाडा, प्र.क्र.४७ ठाकुर्ली चोळेगाव, प्र.क्र.६९ शिव मार्केट, प्र.क्र.७० सावरकर रोड, प्र.क्र.७१ सारस्‍वत कॉलनी, प्र.क्र.७२ पेंडसेनगर, प्र.क्र.७३ इंदिरानगर, प्र.क्र.७४ पाथर्ली, प्र.क्र.७५ टिळक नगर, प्र.क्र.८२ अंबिकानगर, प्र.क्र. ८३ गोग्रासवाडीमध्‍ये हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली. भोईरवाडी,मंगेशी इक्‍वन मध्‍ये धुर फवारणी करण्‍यात आली.


७/ह प्रभागक्षेत्र- सकाळ सत्रात प्र.क्र.६० मधील परिसरात सिटीगार्ड जंतुनाशक फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र. ४८,४९,५०,५१,५२,५३,५४,५५,५६,५७,५८,५९,६०,६१,६२,६३,६४,६५ मध्‍ये हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली. तसेच प्र.क्र. ४९ मध्‍ये धुर फवारणी करण्‍यात आली.


८/ग प्रभागक्षेत्र - सकाळ सत्रात प्र.क्र.७९ सुनिल नगर परिसरात सिटीगार्ड फवारणी करण्‍यात आली असून प्र.क्र.७६ संगितावाडी, प्र.क्र.७७ दत्‍तनगर, प्र.क्र.८१ आनंदनगर, प्र.क्र.७८ तुकाराम नगर, प्र.क्र. ८० एकता नगर, प्र.क्र. ६६ आयरेगांव, प्र.क्र.६७ म्‍हात्रेनगर, प्र.क्र. ६८ राजाजी पथ इत्‍यादी प्रभागामध्‍ये हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली.


९/आय प्रभागक्षेत्र - दुपार सत्रात प्र.क्र.८६ गोळवली पिसवली, शिवाजी नगर, सिध्‍दार्थ नगर येथे सिटीगार्डद्वारे फवारणी करणेत आली. प्र.क्र.१०९ गोळवली, प्र.क्र.११७ भालगांव, प्र.क्र.१०८ आडीवली गांव,प्र.क्र.१०७ श्रीहरी सोसायटी, संतकबीर सोसायटी, गांवदेवीनगर, प्र.क्र.११८ गांवदेवी मंदीर, हरिश्‍चंद्र कॉलनी, प्र.क्र.१०६ शिर्डी नगर, नांदीवलीगांव,प्र.क्र.११९ द्वारर्ली, राजाराम सोसायटी, मंगलमुर्ती सोसायटी येथे हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र.८६ गोळवली, पिसवली, आशेळे, कृष्‍णनगर, प्र.क्र.११८ त्रिमुर्तीनगर, जानकी नगर, आशेळे गांव गणपती मंदीर रोड परिसरात धुरफवारणी करणेत आली.


१०/ई प्रभागक्षेत्र- प्र.क्र.१२२ निळजेगांव परिसरात सिटीगार्डद्वारे फवारणी करण्‍यात आली. प्र.क्र.१११,प्र.क्र.११२, प्रक्र.११३, प्र.क्र.११४ मध्‍ये हॅण्‍डपंपद्वारे फवारणी करण्‍यात आली.


प्रत्‍येक प्रभागात तीन हॅण्‍डफॉगमशीन दैनंदिन कार्यरत आहेत. तसेच प्रत्‍येक निवडणुक प्रभागात एक पितळी पंप जंतुनाशक फवारणी करीता कार्यरत आहे. नाशिक पॅट्रन ६ टॅक्‍ट्रर कल्‍याण डोंबिवली क्षेत्रात दैनंदिन फवारणी करीता कार्यरत आहेत. नविन ४ मॉनटेबल फॉगमशिन, कल्‍याण विभागाकरीता २ व डोंबिवली विभागाकरीता २ असे कार्यरत करण्‍यात आलेले आहेत. दैनंदिन शहरातील कचरा उचलणेकरीता व जंतूनाशक फवारणी करीता व स्‍वच्‍छतेकरीता १० प्रमुख आरोग्‍य निरिक्षक, ६० मुकादम व १५०० कर्मचारी सतत कार्यरत आहेत.


इतका प्रचंड  पालिकेचा  कर्मचारी वर्ग या मोहिमेत राबत असतांना या कामाचा श्रेय मात्र काही नगरसेवक घेण्यासाठी धडपडत असल्याचे विदारक चित्र समाज माध्यमांवर येत असलेल्या फोटो सेशन मधून दिसुन येत आहे .