सराफी व्यावसायिकास ५० कोटीच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी


पुणे : पुण्यात एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची  घटना समोर आली आहे. 


दरम्यान खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार व सामाजिक कार्यकर्ता अशा तिघांचा समावेश आहे. 


आशिष पवार (वय २७, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४५, पाटे संस्कृती, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर), रमेश रामचंद्र पवार (वय ३२, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 


या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सांगितले जात आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की याबाबत माहिती घेण्यासाठी बांदल यांना आम्ही चौकशीसाठी बोलविणार आहोत. त्यांचा या गुन्ह्याशी काही थेट  संबंध आहे का, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर आणि काही पुरावे पुढे आल्यानंतर कळू शकेल.


महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती.


त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली.


या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मंगलदास बांदल हे माजी जिल्हापरिषद सदस्य, बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आहे.