पाणी चोरट्यांकडून पत्रकाराला धमकी


कल्याण : रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी कचोरे येथे आज सकाळी पाणी भरत असताना अचानक नळाला कुलूप लावण्यात आले होते.


ह्याबाबत स्थानिक नागरिकांनी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आदर्श भालेराव यांना माहिती दिली.माहिती मिळताच भालेराव परिसरात गेले असता नळाला लॉक डाऊन मध्ये पाणी भरता भरता नळाला कोणी कुलूप लावून पाणी भरण्यास मना केल्या बदल विचारणा केली आसता तेथील नागरिकांनी आम्हाला दादा ने सांगितले आहे. पाण्याचे पैसे न दिलेल्या लोकांना पाणी देऊ नये म्हणून नळाला कुलूप लावण्यात आले अशी माहिती नागरिकांनी दिली. कोणीही लॉक डाऊन मध्ये अनधिकृत पणे पाण्या बद्दल पैसे मागितले असता किंवा पाणी बंद केल्यास  पोलिसात तक्रार करा किंवा आम्हाला विडिओ काढून पाठवा असे आवाहन  भालेराव  यांनी केली.
तेव्हा तेथील राजेश पाजगे ह्या इसमाने मीडिया मध्ये तक्रार केल्या बदल घरी जाऊन तक्रार दार राजू मोर्या ह्यच्या पत्नी ला शिविगाळ केली.


ह्याची माहिती तक्रार दार याने पत्रकार भालेराव यांना सांगितले असता तत्काळ पुढील माहिती घेण्यासाठी पत्रकार घटनास्थळी गेले असता राजेश पाजगे ह्याने काही महिला ना खोटी माहिती देत गोळा केले की पत्रकार हे त्याचे पाणी बंद करत आहे अशी दिशा भूल करत महिलांना पुढे करून पत्रकार ह्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदर्श भालेराव यांनी पोलीस कंट्रोल  क्रमांक १०० कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. व पोलिसांना घडलेला सर्व प्रकार निदर्शनास आणून देत असताना  अनधिकृत पणे पाण्याचे पैसे गोळा करणारे काही ३-४ महिलाना घेऊन  राजेश पाजगे हे पोलीसा समोर पत्रकार ह्यांनी आमच्या वस्तीत दखल देऊ नये  अन्यथा आम्ही त्यांना मारहाण करू अशी धमकी देत दिली. पोलिसांन समोर पत्रकार यांना महिलेचा आधार घेत मारहाण करण्याची धमकी देत असताना व लॉक डाऊन मध्ये पाणी भरण्यास मनाई करणाऱ्या इसमावर कोणतेही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीत गौरगरीबानकडून दर महा ४६० घराकडून ६० अनधिकृत हजारो रुपये गोळा करून महानगरपालिकेचा महसूल बुडवत आहेत ह्या बाबत पाणी चोरणाऱ्या लोकांवर कारवाई ह्यावि ह्या साठी पालिकेकडे व बेकायदेशीर पणे पैसे गोळा करणाऱ्या टोळी मध्ये काही महिलांचा समावेश आहे   ह्यच्या वर गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून सहायक पोलिस आयुक्त डोंबिवली ह्यांच्याकडे  तक्रार ही देण्यात आली आहे. पालिका प्रशाशन व  पोलीस प्रशासन ह्यांच्याकडून पाणी चोरट्यान संधी दिली जात आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे किती दिवस पोलीस प्राशशन व पालिका प्रशाशन गौरगरीबाची लूट होताना पाहणारा आहे