शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे


मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे या आजपासून संपादकपदी असतील. याआधी उद्धव ठाकरे हे 'सामना'चे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते.


मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी नव्हती. मात्र, आता त्या 'सामना'च्या संपादकपदी असणार आहेत. संपादक हे पद लाभाचं पद असल्यामुळं ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. त्यामुळं आता सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी ही रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे. क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचं नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे हे सामनाच्या संपादकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यामुळं गेले काही महिने हे पद रिक्त होते.


सध्या संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. 'सामना' म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे 'सामना' असंच समीकरण गेली अनेक वर्षे पाहायला मिळाले.


देशातील महत्वाच्या मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून कोणती रोखठोक भूमिका मांडली आहे, याकडे देशभरातील माध्यमांचं लक्ष लागलेलं असतं.


भाजपसोबत सत्तेत असतानाही भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे टीकेची झोड उठवत होते. देशभरातील माध्यमांचं लक्ष असणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादकपद आता रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. आता त्या अग्रलेखातून कोणती आणि कशा प्रकारे भूमिका मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यातील शिवसेना राज्याचे मुखपत्र गेल्या सामना' रश्मी