मुंबई : गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या,गोर-गरीबांना मदत करणाऱ्या तसेच श्रमिक पत्रकारांच्या समस्यांसाठी झटणाऱ्या श्रमिक पत्रकार संघाची मुंबई कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीमध्ये प्रकाश कांबळे यांची अध्यक्षपदी, संदीप गोसावी यांची सचिवपदी तर विश्वास मोहिते यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे,तर डॉ.वैभव देवगिरिकर, किरीट सावला, प्रवीण नार्वेकर, ऍड.नारायण माने यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश संकपाळ व राज्य उपाध्यक्ष अंबादास भालेराव यांनी कल्याण येथील कार्यालयात नियुक्तीचे पत्र दिले.
या कार्यक्रमाला श्रमिक पत्रकार संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते.यावेळी दैनिक बातमीदार चे प्रतिनिधी दीनानाथ कदम,राजू मोर्या व मुस्ताक अन्सारी यांनी देखील नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.