लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा


तळेगाव : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी एका ३८ वर्षीय आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


विशेष न्यायाधीश आर व्ही अदोणे यांनी ही शिक्षा सुनावली. भारतीय दंड संहिता कलम 376 आणि बाललैंगिक अत्याचार (पॉक्सो) नुसार ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.


संभाजी दशरथ जाधव (रा. कुसगाव, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घंटा ऑक्टोबर २०१६ मध्ये घडली होती.


घटनेच्या दिवशी पीडित मुलगी तिच्या अंगणात खेळात होती. आरोपीने तिला उचलून शेतात नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी पहिले. त्यांनी त्यांनी सात साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, तिची आई आणि वैद्यकीय अधिका-यांची साक्ष महत्वाची ठरली.


पोलीस उपनिरीक्षक ए एम लांडगे यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांना पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांनी मदत केली.