कोरोनाच्या माहितीसाठी भारत सरकारने सुरू केला 'व्हॉटसअँप हेल्पडेस्क'


नवी दिल्ली : भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून व्हाट्सअँप हेल्पडेस्क सुरु करण्यात आला आहे. +91 9013151515 या नंबर वरून ‘चाटबोट’ च्या माध्यमातून कोरोनाविषयी हवी ती विश्वासार्ह माहिती मिळवता येणार आहे.


या शिवाय +91-11-23978046 आणि 1075 (टोल फ्री) नंबरवरून तसेच ncov2019@gov.in या ई-मेल द्वारे भारतीय नागरिकांचे कोरोनाविषयीच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.


यासाठी व्हाट्सअँप हेल्पडेस्कचा +91 9013151515 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यांनतर मोबाईलमधील व्हाट्सअँप अँप्लिकेशनमध्ये जाऊन या नंबरला फक्त ‘HI’ मेसेज करायचा आहे. हा मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला रिप्लाय मिळतो, ज्यामध्ये A ते F पर्यंत वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. समजा तुम्ही A टाईप करून पाठवले तर त्यासंबंधित माहिती तुम्हाला मिळते.


उदाहरणादाखल, A या पर्यायावर कोरोना म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती, असा प्रश्न आहे . तुम्ही A टाईप केले तर या प्रश्नाचे उत्तर व त्याच्याशी निगडित वीडिओची यु-टूब लिंक तुम्हाला व्हाट्सअँपवर मिळते. जर तुम्हाला कोरोनाबद्दल काही शंका किंवा समस्या असतील तर या नंबरवर संपर्क साधून माहिती मिळवू शकता.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image