सुजाण कर्तव्यदक्ष नागरिक व सुजाण कर्तव्यदक्ष संघटना यांच्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत काही सूचना व मागण्यांचे पत्र

मा. उध्दव ठाकरे साहेब
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य शासन
मंत्रालय, मुंबई 


विषय : सुजाण कर्तव्यदक्ष नागरिक व सुजाण कर्तव्यदक्ष संघटना म्हणून कोरोना COVID 19 या आपल्या देशात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत काही चुकीच्या गोष्टी, बाबी, पाऊले निदर्शनात येत आहेत त्याबाबत खालील सूचना व मागण्या करीत आहोत आपण त्याची योग्य व गंभीरतेने त्यांची दखल घ्याल ही अपेक्षा


माननीय महोदय,


१) कोरोना COVID 19 ही चाचणी शासनाच्या वतीने देशातील तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकांची होणे गरजेचे व अपेक्षित आहे.


covid 19 ची सर्व नागरिकांची चाचणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी व प्रत्येक नागरिकांच्या घरा घरात जाऊन घेण्यात यावी . जी  जनता,नागरिक  बेघर आहेत त्यांची शासकीय सार्वजनिक  निवारा केंद्रात तात्पुरती व्यवस्था करून त्यांना दाखल करून त्यांचीही चाचणी करण्यात यावी त्यामुळे पुढे जाऊन रुग्णांची संख्या व रुग्ण पण निश्चित होऊन त्यांना सेवा सुविधा देणे सोप होईल व सर्वदूर पसरलेले भीतीचे सावट ही काही प्रमाणात कमी होईल व प्रशासनावरील ताण कमी होईल.


२) आरोग्य मंत्री साहेबांनी रुग्णासाठी येणाऱ्या कठीण काळाची पाऊले ओळखून मोठ्या संख्येने रक्तदान करा असे आव्हान नागरिकांना राज्यातील जनतेला  केले आहे पण जे रक्तदान करणार आहेत एका चांगल्या व उदात्त हेतूने पण त्यांना हेच माहीत नाही की ते covid 19 बाधित आहेत का? नाही ? तर हे भविष्यात किती धोकादायक ठरू शकते आपण याची तात्काळ दखल घ्यावी .


जे रक्तदान करू इच्छितात व रक्तदान घेण्यासाठी येणार आहेत त्यांची covid 19 ची चाचणी करून व ते बाधित नसल्याचे निष्पन्न झाल्यावर रक्तदान करण्याची परवानगी देण्यात यावी व तशी शिबिर आयोजित करावी.


3) या देशापुढील  कठीण काळात कितीतरी समाजसेवी संघटना, विभागा विभागातील विविध प्रकारे ,विविध मार्गांनी समाजाची सेवा करणारे  समाज सेवक असंघटित कामगार, वस्तीत राहणारे हातावर पोट असणाऱ्या  गोर गरीबांना गैरसोय होऊ नये यासाठी  अन्नदान करत आहेत सेवा सुविधा गोर गरीबांना पुरवीत आहेत त्यांचा हा उद्देश व कार्य खरोखरच अभूतपूर्व व अभिनंदनास पात्र असे आहे त्यांना इतर ही  समाज सेवेची आवड असणारे समाजातील इतर  नागरिक,तरुण उस्फूर्तपणे स्वतः हून मदत करीत आहेत. पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी देखील त्यांना मदत करीत आहेत पण हे अन्न भाजीपाला जिथून येते आहे त्यासर्व व्यक्तीची तसेच जे हे अन्न साफ करीत आहेत,  शिजवत आहेत त्या सर्वांची तसेच जे त्या अन्नाचे वितरण करणार आहेत त्या सर्वांची covid 19 ची चाचणी झाली आहे का ? ते बाधित तर नाही ना ! हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. ही सेवा देणाऱ्या सर्वांचा हेतू जरी पवित्र व उदात्त असला तरी याबाबत झालेली छोटीशी चूक देखील असंख्य नागरिकांचा जीव धोक्यात आणू शकते. याची आपण नोंद घ्यावी.


समाजसेवा करणाऱ्या अन्नदान करणाऱ्या यासर्व संघटनेतील रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची व सेवा पुरवणाऱ्या सर्व कामगार वर्गाची व विभागा विभागात   समाजसेवी ची आवड असणाऱ्या व या कठीण काळात अर्ध वेळ किंवा संपूर्ण वेळ कामाची आवड असणाऱ्या सर्वांचीच covid 19 ची चाचणी शासनाने करून घ्यावी व त्यापैकी कोणीही बाधित नाही व  नसेल हे सिद्ध झाल्यावर त्याला शासना तर्फे त्याची हे समाज सेवेचे काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे असे अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे त्यामुळे ते त्यांचे समाजसेवेचे काम योग्य ती खबरदारी घेऊन बिनदिक्कतपणे करू शकतात व समाजाला त्यांची खूपच मदत होईल. 


समाज सेवेची आवड असणाऱ्या व शासन ज्यांची ओळखपत्र देऊन नियुक्ती करेल त्या  प्रत्येकाला शासनाच्या वतीने आरोग्य विभागाच्या तर्फे स्वतः ची  कोणत्या प्रकारे व काय काय दक्षता घ्यावी याचे एक दिवसाचे किंवा काही तासांचे योग्य प्रशिक्षण देण्यात यावे व त्यांना  प्रशिक्षित करून समाजाची सेवा करण्यासाठी पाठवावे कारण ते सर्वजण समाज सेवक नसून इतर सर्व भारतीय नागरिकांच्या साठी पुढील कठीण काळासाठी देवदूत असणार आहेत व पुढे जाऊन देवदूताची ही भूमिका समाजासाठी बजावणार आहेत.


४) शासनाने सांगून देखील जनता भाजी पाला व घरात लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी बाजारात रोज गर्दी करत आहे त्यामुळे शासनाचा मूळ उद्देश सफल होताना दिसत नाही.


सूचना व मागणी शासनाने प्रत्येक विभाग वार वेगवेगळ्या सेवा पुरवणारे विभागाची वर्गवारी करून त्या त्या वस्तू हव्या असतील तर जनतेने त्या त्या दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा त्या जीवनावश्यक वस्तू जनतेला, नागरिकांना घरपोच मिळतील याची व्यवस्था करावी पण या व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाची covid 19 ची चाचणी नक्की करावी व या कामात शासन त्यांनी नियुक्त केलेले ओळखपत्र दिलेल्या समाज सेवकांचा उपयोग करून घेऊ शकते त्यामुळे बाजारात रोज होणारी घातक अशी गर्दी आपण टाळू शकतो.


५) शासन घरात रहा असे आव्हान करून देखील कितीतरी नागरिक, जनता काम नसताना घरात करमत नाही म्हणून रस्त्यावर उतरत आहे


जे विनाकारण रस्त्यावर उतरत आहेत त्यांना शासनाने जे देशसेवेसाठी समाज सेवेसाठी काम करणार आहेत जनतेला सेवा पुरविणार आहेत तसेच समाजसेवक कार्यकर्ते घडवावे त्यासाठी त्याची कमीत कमी पाच दिवस असा प्रशिक्षण केंद्रात त्यांना ठेवावे covid 19 रुग्ण जेथे उपचार घेत आहेत  तेथील रुग्णालयात त्यांना भेट देऊन आणावे त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना दूरध्वनी वरून संभाषण करून द्यावे त्यामुळे त्यांना परिस्थितीचे व वस्तुस्थितीचे गांभिर्य जवळून कळेल त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होऊन दे दक्ष नागरिक व समाजसेवक होऊ शकतात त्यानंतर त्यातील इच्छुकांची त्यांना शासनामार्फत ओळखपत्र देऊन समाजसेवेसाठी नियुक्ती करावी.


६) अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व शासन विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी वर्गाच्या उदा. संपूर्ण पोलीस विभाग , सर्व नगरपालिका,महापालिका,नगर पंचायती मधील सफाई कर्मचारी वर्ग ,सर्व बँकेतील सेवा देणारे सर्व अधिकारी व कर्मचारी,रुग्णांना सेवा देणारे सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय,सुरक्षा रक्षक रुग्णवाहिका वाहक,चालक  इतर सर्व वैद्यकीय सेवेशी निगडित सर्व कर्मचारी वर्गाची covid 19 चाचणी प्रथम प्राधान्यक्रमाने करावी कारण तेच  निरोगी असतील तर ते त्यांचे काम नंतर योग्य दक्षता घेऊन करू शकतात व समाज निरोगी ठेवण्याच्या या कामात मोलाचे योगदान देऊ शकतात.


७) जीवन आवश्यक वस्तू विकणारे जे ही व्यापारी असतील जे दुकान टाकून आहेत व जे रस्त्यावर धंदा करणारे आहेत उदा. अन्न धान्य, भाजी , फळे विकणारे तसेच मासे विकणाऱ्या कोळी महिला असतील त्यांची तातडीने covid 19 ची चाचणी करून घेण्यात यावी व त्यांना सर्वांना ते जेथे आपला धंदा व्यापार करीत असतील तेथे त्यांना या आपत कालीन परिस्थितीत कोणती व कशी दक्षता घ्यावी याचे शासनाचे अधिकारी व जे प्रशिक्षित केलेले समाजसेवक आहेत त्यांच्या मार्फत योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. जर ही सूचना शासनाने लवकरात लवकर आमलात आणली तर या सर्व जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या व्यापार धंदा करणाऱ्यांच्या बरोबर त्यांच्या कडून हे सर्व जीवनावश्यक वस्तू विकत घेणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना पण दिलासा देणारी व फायदेशीर बाब होईल.


8) ज्याप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना शेतात जाऊन शेती करण्यास परवानगी दिली आहे. त्यासर्व शेतकऱ्यांची covid 19 ची चाचणी तत्काळ करावी. तसेच मासेमारी करणारा व त्यावर अवलंबून असलेला कोळी, आगरी व इतर जाती जमात (जे मासेमारी करतात ते सर्वच) त्यांना पण मासेमारी करण्याची शासनाने परवानगी द्यावी कारण शेतकरी जसा त्याच्या शेतात, जमिनीवर शेती करतो त्याप्रमाणेच मासेमारी करणाऱ्या जमातीची मस्त्यशेती करण्याची (जमीन) ठिकाण हे समुद्र,खाडी,तलाव हे आहेत हा  व्यवसाय करणारे व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांची तातडीने covid 19 ची चाचणी करण्यात यावी व त्यानंतर जे बाधित नसतील त्यांना मासेमारी करण्यासाठी व त्यावर अवलंबून असणारा व्यवसाय करण्याची शासनाने परवानगी द्यावी.
   
तरी साहेब आम्ही दिलेल्या या सूचनांचा मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार कराल  या कठीण काळात आणि कोणत्याही देशाच्या हितासाठी आपण जे ही काम कराल किंवा पाऊले  उचलाल त्या कामात आमच्या सर्व संघटना व  आम्ही सर्व भूमिपुत्र व रहिवाशी नागरिक आपणास संपूर्ण सहकार्य करू आपण वरील सूचनांची योग्य दखल घ्याल हीच अपेक्षा 


आपले विश्वासू
 
*मी स्वतः माझा रक्षक*
*मी माझ्या विभागाचा रक्षक* 
*मी माझ्या प्रभागाचा रक्षक*
*मी माझ्या गावाचा रक्षक*
*मी माझ्या देशाचा रक्षक* 


*ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती*
*कोळीवाडा गावठाण सेवा समिती*
*चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती*


प्रत रवाना


महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी