कळवा प्रभाग समिती क्षेत्रामधील प्रभाग क्रमांक 25 मधील घोलाई नगर, इंदिरा नगर व आनंद विहार सोसायटी परिसरातील पावसाळ्यामध्ये उद्भवणा-या पूरग्रस्त परिस्थितीवर उपाययोजना करणेसाठी गृहनिर्माण मंत्री सन्मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने आणि मा. विरोधी पक्षनेते मा. श्री. मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व ठाणे महानगरपालिकेमधील अधिकारी यांचा संयुक्तीक पाहणी दौरा आयोजित केला होता.
घोलाई नगर येथील FOB जवळील अस्तित्वात असलेला 10 फूट जुना नाला सद्यस्थितीत बंद अवस्थेत असून त्या नाल्याची पाहणी करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सदरचा नाल्याची साफसफाई करुन त्यामधील गाळ काढण्यात येईल असेल उपस्थित संबंधीत विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
घोलाई नगर FOB हायवेकडील बाजूस असलेला पूल हा एकाच ठिकाणी पाय-या देऊन उतरविण्यात आला असल्याने या परिसरातील नागरीकांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना चढ उतार करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे सदर पूलाची बाजू ही उतार करुन खाली उतरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
घोलाई नगर अपर्णाराज सोसायटीमधील तसेच साई दर्शन चाळ या परिसरातील नाला हा काटकोनात वळत असल्यामुळे सदर सोसायटी परीसरात तसेच आजूबाजूच्या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ही बाब रेल्वे अधिका-यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावेळी त्यांनी रेल्वे खालील अस्तित्वातील नाला / कल्व्हर्ट हा पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात असे दोन वेळा साफसफाई करण्यात येईल व सदर नाल्याचे काटकोनी वळण शक्य तितके सरळ करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले.
घोलाई नगर येथील ऋषिकेश गार्डन येथील सुरु असलेले थिमपार्कच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांना रेल्वेच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी नव्याने FOB बांधून मिळणे बाबत मागणी केली . तसेच त्याच ठिकाणी रेल्वे पूलाखालून जाणा-या नाल्याची पाहणी करुन तो पुर्ववत करुन देण्याचे आश्वासन संबंधीत अधिका-यांकडून देण्यात आले.