आरोग्य शिबिराला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कळवा रेल्वे स्थानक येथे भारतीय मराठा संघ आणि सेंट्रल रेल्वे वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी शेकडो प्रवाशांनी विविध टेस्ट करून आरोग्याची तपासणी करून घेतली. याप्रसंगी भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, उपाध्यक्ष दीपक पालांडे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम, कोषाध्यक्ष अजित जाधव, ठाणे शहर अध्यक्ष निलेश म्हसकर, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा अनघा जाधव, ठाणे शहर अध्यक्ष तपस्या कश्यप, उपशहर अध्यक्ष कांचन साळुखे, एंड उमा धापते, कल्याण तालुका अध्यक्ष सीमा बोडके, विद्या माने, जितेंद्र माने, विशू पोटे, मुंबई उपाध्यक्ष सविता मोरे, डॉ. सयी खबाले, डॉ. जोगेंद्र सिंग, भावना कोयंडे, सरिता सापले, वैभवी तांबे, अश्विनी कुंभार, नम्रता पाटील, कळवा स्टेशन मास्तर के. जी. विनोद आदी मान्यवर उपस्थित होते.


मराठा समाजाकरिता अग्रेसर असणाऱ्या भारतीय मराठा संघाच्या वतीने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य सुदृढ राहावे. याकरिता भारतीय मराठा संघ आणि सेंटल रेल्वे वन रुपी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा रेल्वे स्थानक पश्चिम येथील वनरुपी क्लिनिकमध्ये प्रवाशांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन कळवा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर के. जी. विनोद आणि भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मोफत मध्ये ब्लड ग्रुप, शुगर, कान, नाक, घसा, डोळे, ईसीजी, ब्लड प्रेशर, त्वचांचे विकार, थायरॉईड, वजन, बीपी चेकअप अशा विविध तपासणी करण्यात आल्या. या शिबिरात मुंबई पासून कळवा, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, उल्हासनगर येथून आलेल्या प्रवाशांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतली.


या शिबिराला वन रुपी क्लिनिकचे संचालक राहल घुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. तसेच भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या प्रयत्नामुळे आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी रेल्वे तुन लाखो प्रवासी प्रवास करत असतात, प्रवास करत असताना गर्दीमुळे अनेक प्रवाशांना आजारांना सामोरे जावे लागते. कार्यालयीन कामातून लोकल प्रवास करताना आपल्या आरोग्याकडे प्रवाशांचे लक्ष लागत नाही. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याची काळजी प्रवाशांनी वेळीच घेण्याकरिता कळवा रेल्वे स्थानकात मोफत पने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे यापुढे देखील आणखी काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर मोफतमध्ये आरोग्य शिबीर घेणार असल्याचे भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.