डोंबिवली : ११मार्च २०२० रोजी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाला ३१ वर्षे पूर्ण झाली. ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन काढलेले हे ग्रंथसंग्रहालय दिवसेंदिवस विकसित होत आहे. वाचकांची वाचनाची क्षुधा पूर्ण करण्यासाठी ग्रंथसंग्रहालयाशी जोडलेली सर्व मंडळी सदैव तत्पर आहेत. साहित्याच्या प्रत्येक प्रकाराशी संबधित पुस्तके येथे उपलब्ध आहेत.
वेद उपनिषदांवर अभ्यास करायचा आहे.. या..ते ही दालन खुले आहे. तरुण पिढीची आवड असो वा वृद्धांच्या कक्षा वा प्रौढांचा परीघ.. इथे सारे काही सांभाळण्याचा प्रयत्न केला जातो.. अभ्यासिकेत कितीतरी विद्यार्थी येऊन अभ्यास करत असतात आणि त्यांच्याकडे लक्षही दिले जाते. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचे मार्गदर्शनपर कार्यक्रम केले जातात. 'लेखकही भेटीला' येत असतात. काव्य साहित्य आणि संस्कृती असा त्रिवेणी संगम करण्याचा प्रयत्न चोख केला जातो.. ग्रंथालयाचे ज्येष्ठ नागरिक आपले वय विसरून कार्यरत आहेत आणि आमच्या या कुटुंबात नव्याने आलेली ग्रंथपाल तपस्या नेवे तर उत्साहाचा धबधबा.. तिने ग्रंथसंग्रहालयाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.. अशी सगळे उत्साही वीर ग्रंथालयाची धुरा सांभाळत आहेत.