दिल्ली – केंद्र सरकारने ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर ५२ रुपयांनी स्वस्त करून दिलासा दिला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर एक मार्चपासून लागू झालेत.
विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (सुमारे १४.२ किलोग्रॅम) ५२ रुपयांनी स्वस्त झाला असून ८९३ रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मार्च महिन्यापासून ८४१ रुपयांना मिळणार आहे.
फेब्रुवारीमध्ये १४४.५० रुपये इतकी वाढ झाली होती.