मुरबाड तालुक्यात वादळी वा-यासह गारांच्या पावसाचा तडाखा


मुरबाड : आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वा-यासह गारपिटीच्या पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल झाला आहे.


एप्रिल-मे महिण्याच्या तप्त उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना, आज तालुक्यातील डोंगर भागात वादळी वा-यासह  गारपिट करीत आलेल्या मुसळधार पावसाने जवळपास दिडदोन तास तडाखा दिल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या धामधुमीत नोकरी, उद्योग, धंदे,दुकाने, बाजार पेठा पुर्णता ठप्प झाल्या असुन, उदरनिर्वाहाची सर्व साधने बंद झाली आहेत,उरला फक्त पर्याय एक तो म्हणजे शेती,मात्र घराबाहेर पडणे कायद्याने गुन्हा, तर आरोग्याच्या द्रुष्टीने भितीदायक व नुकसान कारक असल्याने शेतीची कामे हि.ठप्प झाली आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी हा अनेक व्याधीने विवंचनेत पडला आहे.लग्न कार्य थांबली,हाताला काम नाही ,वाढती महागाई, त्यात बेरोजगारीने हैराण झाला आहे.कडक उन्हात धड शेतीची कामे करता येत नाही, त्यात अचानक  वादळी वा-यासह गारपिटिच्या पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील जनजिवन विस्कळीत होत असुन त्याचा परिणाम सर्वत्र होत आहे.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image