कोवीड १९ साठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मदत विमा योजना जाहीर


ठाणे : कोविड - १९ विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या सर्व कर्मचा-यांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मदत विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.


कोरोना विरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.


यामध्ये रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांचा विमा काढला जाणार आहे. त्यामध्ये डॉक्टरसह आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि तंत्रज्ञांचाही समावेश आहे.


कोरोना विषाणूच्या विरूद्ध लढा देण्याऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेमुळे मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत यासाठी तरतूद करून नवीन मदत पॅकेज सुरू करण्यात आले आहे.


यामध्ये फॉर्म -1 (कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास नुकसानीचा वैयक्तिक विमा)आणि फॉर्म -२ ( संबंधित कर्तव्य बजावताना झालेल्या अपघाती दुर्घटनेतील नुकसानासाठी वैयक्तिक अपघात विमा ) या दोन योजनेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यातील फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.